Principal Message


समाजशील , सुसंस्कारी आणि जागतिकीकरणाच्या दिशेने झेपावणार्‍या माझ्या शिक्षक मित्रानो पश्चिम महाराष्ट्र ही शिक्षण तपस्वीची भूमी आहे कर्मवीर भाऊराव पाटील डॉ. बापूजी साळुंखे कर्मवीर जगदाळे मामा आणि अन्य अनेक शिक्षक महर्षीनी संपूर्ण जीवनाची तेलवात समाजाच्या प्रकाशमय संस्कारी साक्षर मूल्यांसाठी तेवत् ठेवली.ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या ध्येयाने प्रेरित होऊन शिक्षण परिवर्तनाच्या मूशीतून समाजनिर्मीती व राष्ट्रनिर्मीती करण्यासाठी ज्यानी आपल्या आयुष्यात पायाला भिंगरी बांधून अवघा पश्चिम महाराष्ट्र शिक्षणाच्या परिणामकारक बदलाला सामोरा जाण्यासाठी जिद्दीने आणि चिकाटीने हा भूभाग पादाक्रांत केला ते तपस्वी पाटील डॉ. प. पू. बापूजी साळुंखे हे होते.ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार या तीन तीर्थस्थानांची एकत्रीत गुंफन करून समाज मनाला व समाजाला प्रगतीच्या हिंदोळ्यावर डोलायला आणि नाचायला लावण्याची महान कार्य श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून करण्याचे भाग्य या देवत्वरूपी शिक्षणमहर्षीला प्राप्त झाले. या प्रगतीच्या पाऊलखुणा पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये उमटवल्या प्रत्येक पाऊल खुणेस एका संस्कार केंद्राची उभारणी करण्याचा मनोदय आकाराला येवू लागला त्याच पाऊलखुणेने व त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या तासगाव शहरामध्ये १९६० साली या शिक्षणाच्या भगीरथाने अध्यापक ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन तासगाव (दत्तमाळ) ता. तासगाव जि. सांगली या संस्कार केंद्राची शिक्षक निर्माण करणारी शाखा निर्माण केली.पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्याचा अंतर्भाव होतो. हा वैभवशाली जिल्हा आहे. या जिल्ह्याचे वैभव म्हणजे आदर्शवादाचे स्फुल्लिंग सतत जागृत ठेवणारा तासगाव हा एकमेव तालुका आहे. सांगली जिल्ह्यातील व तासगाव तालुक्यातील शेतकरी हा द्राक्ष, कापूस, उस, हळद, मिरची इ. पिकाचे भरघोस उत्पादन काढणारा प्रगतशील शेतकरी राज्याच्या विकासाचा कणा आहे. या शेती पिकावर प्रक्रिया करून बेदाणे, हळदपूड मिरची उत्पादने साखर निर्मीती , कापडनिर्मीती अशा लघुउद्योगांचे व कुटिरोद्योगांचे केंद्र बनला आहे. इथला शेतकरी खूप कष्टाळू आहे तसाच तो निसर्गाबरोबर मैत्री करून उत्पादन वाढवणारा भाग्यशाली शेतकरी या देशाचे वैभव आहे.तासगाव शहराला ऎतिहासिक वारसा असून तासगाव शहरात उजव्या सोंडेचा गणपती नवसाला पावणारा आहे. या गणेशाच्या मंगलमय नगरीत तासगाव परिसरातील शिक्षणाची मशाळ बनलेले शिक्षकांचे ट्रेनिंग कॉलेज १३-०६-१९६० पासून ज्ञानदानाचे भरीव कार्य करीत आहे. हे एक नावाजलेले अध्यापक महाविद्यालय आज यशाच्या गिरीशिखरावर असून विद्येची आराध्य देवता ’गणराय’ यांच्या पवित्र वास्तव्याने या देवभूमीत सरस्वतीच्या संस्काराचे शैक्षणिक नाद ऎकावयास मिळतात. या गणरायाचा श्री भाद्रपद गणपती उत्सव इ.स. २०१६ शके १९३८ श्री गणपती पंचायतन देवस्थान यांच्या मार्फत ’रथोत्सव’ साजरा केला जातो. हा आमच्या तासगावातील दिड दिवसाच्या गणपतीचा उत्सव याला खूप जूनी ऎतिहासिक परंपरा आहे त्याचे विवेचन पुढे स्वतंत्रपणे केलेले आहे."ज्ञानवर्धन,ज्ञानसंवर्धन व ज्ञानदान" याच आपल्या जीवित ध्येयाशी प्राणप्रतिष्ठेने एकनिष्ठ राहुन सरस्वतीची म्हणजेच चैतन्याची अखंड उपासना करणारे थोर समाज शिक्षक म्हणजे बापुजी - गोविंदराव ज्ञानोजी साळुंखे युगानुयुगाच्या अंधाराला प्रकाशाचे शक्तिमान वरदान देण्यात संपुर्ण आयुष्यच झोकुन देणार्‍य़ा डॉ. बापुजी साळुंखे यांनी पावित्र्य मांगल्य व नैतिक मुल्यावर श्रद्धा ठेवुनच वाटचाल केली.हिंदु संस्कृतीचा आणि अध्यात्माचा सार्थ अभिमान बाळगणार्‍या स्वामी विवेकानंदांच्या नावाने "श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था" सुरु केली. प.पु. डॉ. बापुजी साळुंखे हेच या संस्थेचे संकल्पक,संस्थापक व कार्याध्याक्ष होते. त्यांचे जीवन व शैक्षणिक कार्य म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. सत्य, प्रामाणिकपणा,चारित्र्य,पिळवणुक प्रवृत्तिस आळा,सेवा आणि त्याग या जीवनातील मौलिक निष्ठांची पंचसुत्री शिक्षणाच्या माध्यामातुन माणसाच्या जीवनात उतरविण्याचा प्रयत्न केला तसेच प्राचीन काळातील गुरुपरंपरेला धरुन शिक्षक कार्यकर्ते म्हणजेच गुरुदेव कार्यकर्ते यांच्या आदर्श जीवनाच्या धड्यातुनच नवीन शिक्षण निर्माण करण्याचा जाणिवपुर्वक प्रयत्न केला. बापुजींनी शिक्षणव्यवस्थेमध्ये विद्यार्थी हाच केंद्रबिंदु मानला होता. त्याच्याद्वारेच देशाची जडण-घडण योग्यरीतीने होऊ शकेल असा ध्यास बापुजींनी घेतला होता.विर्ध्यांच्याबाबत बापुजींना कमालीची आस्था होती.विध्यार्थांविषयी ते म्हणतात "प्रत्येक विद्यार्थी मुलतः सतप्रवृत्त, संवेदनक्षम, सत्यपुजक व ज्ञानशोधक असतो."सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे तणाव त्याच्या मुळच्या प्रवृत्तिमध्ये विकार आणतात. विद्यार्थी विकारशील असु नये. त्याला सामाजिक व राष्ट्रीय जवाबदारीची जाणिव शिक्षकानी करुन दिली पाहीजे.अध्यापकासाठी बापुजींनी श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यामातुन ८ डी.टी.एड. कॉलेज व ३ बी.एड. कॉलेज निर्माण केली. या अध्यापकांच्या महाविद्यालयामुळे संस्थेतील आवश्यक असणारा गुरुदेव निर्माण केला. शिक्षकाच्या अंगी असणार्‍या सर्व गुणांना वाव देवुन समाजनिर्मीतिचा ध्यास घेणार्‍या बापुजींना आपल्याच विध्यार्थांसाठि आपणच निर्माण केलेले शिक्षक संस्थेत निवडले त्यामुळे शिक्षकाच्या अंगी असणारी पंचशील तत्वे बापुजींच्या अथक प्रयत्नातुन समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविता आली.या अध्यापक जुनिअर कॉलेज मध्ये विविध उपक्रमाद्वारे विध्यार्थांच्या सुप्तशक्तिंना वाव दिला जातॊ. वक्तृत्व, निबंधस्पर्धा, चित्रकलास्पर्धा, वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्य लेखनास प्रवृत्त केले जाते.१२ ते १९ जानेवारी श्री स्वामी विवेकानंद सप्ताह साजरा केला जातो यामध्ये कॉलेजस्तर,जिल्हास्तर, विभाग आणि राज्यस्तरापर्यंत विद्यार्थी विविध स्पर्धा मध्ये भाग घेउन आपल्य अंगच्या कलागुणाने नेत्रदिपक यश संपादन करतात.या संस्थेचे मुख्य कार्यालय ’कोल्हापूर’ महाराष्ट्र येथे असून या संस्थेचे ध्येय व उद्देश पुढील प्रमाणे आहेत.  1. सामान्य समाजात सुसंस्कारी शिक्षणप्रसाराच्या साधनाने समाजाचे परिवर्तन घडवून आणणे
  2. सत्य, प्रामाणिकपणा, चारित्र्य, पिळवणुक प्रवृत्तीस आळा त्याग सेवा व प्रेम या जीवनातील मौलिक निष्ठा जीवनात उतरविण्याचा प्रयत्न करणे हा आमच्या सुसंस्कारी शिक्षणाचा हेतु आहे.
  3. कला,विज्ञान,वाणिज्य, शेती, समाजशास्त्र तंत्र वैद्यकिय, कायदा अभियंता शिक्षणाची दालने सर्वासाठी खुली करून ठेवली आहेत.
  4. प्राथमिक माध्यमिक व उच्चशिक्षणाव्दारे समाजहीत जोपासणे
  5. प्राचीन काळातील गुरू परंपरेला धरून शिक्षक कार्यकर्ते यांच्या आदर्श जीवनाच्या धड्यातूनच नवीन शिक्षणपध्दती निर्माण केली जाईल जिच्यामुळे आत्मसमर्पण, प्रामाणिकपणा, सत्य समता नि बंधुता या वृत्तीचा परिपोच केला जाईल.


सन १९५४ साली संस्थेची स्थापना झाली तर या शाखेची मुहूर्त मेढ १९६० साली संस्थापित केली या पूर्ण संस्थेची संस्कारशील प्रार्थना असून ती दररोज सर्व शाखामध्ये परिपाठाच्या माध्यमातून विद्यार्थी गायन करत असतात व त्यातील आशयाचा आपल्या जीवनाशी संबंध जोडत असतात या प्रार्थनेमध्येच ईशावास्योपनिषद ही म्हटले जाते. याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.अग्ने नय सुपथा राये अस्मान
विश्वानि देव वयुनानि विव्दान ।
युयोध्यस्मज्जू हुराणमेनो
भूयिष्ठा ते नम - उक्ति विधेय ॥
-ईशावास्योपनिषद" हे प्रकाशमय परमेश्वरा आम्हा मानवाना सुमार्गाने घेऊन चल आम्हा मानवांच्या मनात वाईट विचार येऊ देऊ नकोस अशा वाईट विचारापासून आम्हास परावृत्त कर अशी आम्ही तुला पुन्हा पुन्हा कर जोडून प्रार्थना करतो."बापूजीनी दिलेली प्रार्थना हाच एक विवेकाचा आदर्श नमुना आहे. या विवेकाच्या सामर्थ्यावरच राज्याची जडणघडण करणारी ही एकमेव श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था असून या संस्थेची धुरा प. पू. डॉ. बापुजी यांचे सुपूत्र मा. श्री अभयकुमार साळुंखे सर व त्यांची कन्या सौ. शुभांगीताई गावडे मॅडम यांच्याकडे आहे ते दोघेही समर्थपणे ही संस्था प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी तत्पर आहेत.’जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’ या उक्तीचा पुरेपूर सार यां दोघाकडे असल्याने संस्थेच्या विकासाची विजयश्री सदैव डोलत राहील याबाबत शंका नाही.भारतभूमी ही सळसळत्या तरूणाईने डवरलेली आहे. जगाच्या विकास प्रक्रियेचे नेतृत्व भारतभूमीने करावे या साठी सक्षम युवकांची पायाभूत तयारी करून घेणारे ’अध्यापक’ घडविणारा भविष्यवेता विद्यार्थी आपणास निर्माण करावा लागणार आहे.देशाला शिक्षणाच्या भूमिकेतून प्रगतशील बनविण्यासाठी या देशाच्या विकासाची धुरा अध्यापकांच्या खांद्यावर आहे. म्हणूनच नवोगत शिक्षक निर्मितीसाठी छात्राध्यापकामध्ये मूल्य संस्कार रूजविण्याला आणि कौशल्य विकसित करण्यास खूप महत्व प्राप्त झालेले आहे.शिक्षक म्हणून जडण घडण करण्यासाठी योग्य अशा सेवापूर्व अभ्यासक्रमाची काल सुसंगत पुनर्रचना करण्याची जबाबदारी राज्य शिक्षक प्रशिक्षण मंडळ १९६८ सालापासून पार पाडत आहेत. या विकसनाच्या वाटचालीत, प्रस्तुत प्राथमिक शिक्षण पदविका (डी.टी.एड.)अभ्यासक्रम मैलाचा दगड आहे.शिक्षण क्षेत्रात प्रचंड वेगाने आमुलाग्र बदल घडून येत आहेत. या बदलांच्या अनुषंगाने आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०१० यातील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्याचा प्राथमिक शालेय स्तरावरील अभ्यासक्रम २०१२ या वर्षात पुनर्रचित करण्यात आला आहे १ एप्रिल २०१० पासून "बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा राष्ट्रीय आराखडा-२००९ प्रस्तुत केला आहेशिक्षक शिक्षणाच्या सद्यास्थिती संदर्भात न्या. वर्मा कमिशनने केलेली एक प्रमुख शिफारस - सर्व स्तरावरील शिक्षक प्रशिक्षणांच्या अभ्यासक्रमांची तातडीने पुनर्रचना करावी. एन सी एफ टी ई-२००९ च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये हीच बाब अधोरेखित करण्यात आली आहे सध्या महाराष्ट्राने ’प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ हा कार्यक्रम हाती घेतलेला असून यात प्रत्येक मुकस शिक्षणाच्या प्रवाहात आणून सन २०१७ पर्यंत राज्यातील सर्व शाळा प्रगत करण्याचा निर्धार केलेला आहे. या सर्व बदलांचा विचार करुन महाराष्ट्र राज्यातील सेवापूर्व प्रशिक्षणांचा अभ्यासक्रम पुनर्रचित करण्यात आला आहे.प्राथमिक शिक्षण पदविका (D.T.Ed) अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली असुन विकसनशील देश प्रगतशील बनविण्यासाठी शिक्षणात महत्वपुर्ण गुंतवणुअक करुन गुणवत्तावाढीसाठी अधिक लक्ष दिलेले आहे.Curriculum of Diploma in Elementary Educationप्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमाची पुनर्रचना ही सकारात्मक बदल घेऊन येईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करु या. बालकांच्या मोफत व सक्तिच्या शिक्षणाचा अधिकार नियम २००९ नुसार प्राथमिक शिक्षणाचा इयत्ता १ ली ते इयत्ता ५ वी प्राथमिक स्तर आणि इयत्ता ६ वी ते इयत्ता ८ वी उच्च प्राथमिक असा आकृतीबंध आहे. या आकृतीबंधानुसार इयत्ता १ ली ते इयत्ता ५ वी ला H.Sc. D.Ed. व इयत्ता ६ वी ते इयत्ता ८ वी ला पदवीधर पदविका (B.A./B.Sc./B.Com D.Ed.) अर्हता असलेल्या शिक्षकांची नेमणुक केली जाणार आहे. हा दृष्टीकोन निश्चितच प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल.सारांश रुपाने असे म्हणता येईल की या कॉलेज मधुन राष्ट्रीय संपत्तीचा सन्मान करणारा व प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणारा शिक्षक निर्माण करता येईल. या कॉलेज मध्ये असणारी उपक्रमशीलता नावाजण्यासारखी असुन काही महत्वपुर्ण उपक्रमांचा उल्लेख करणे आवश्यक वाटते.क्रीडा स्पर्धा जिल्हास्तरावर पार पाडल्या जातात. या कॉलेजच्या विध्यार्थांनी क्रीडा स्पर्धेमध्ये नेहमीच घवघवीत यश मिळवीले आहे.सहशालेय उपक्रमामध्ये हे कॉलेज नेहमीच आघाडीवर राहिले आहे.या कॉलेजमधील माझे सर्व सहकारी, प्राध्यापक, सेवक अतिशय तळमळीने आपल्य कार्यामध्ये सहभागी होतात. सर्व प्राध्यापक आपापल्या विषयात पारंगत आहेत.सेवक सुद्दा दिलेली जवाबदारी व्यवस्थीतरित्या पार पाडतात.श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था हि आपल्या राज्याचे भुषण आहे. ३७५ संस्कार केंद्रांचा व्याप सांभाळुन समाजाची जडण घडण करणारी हि शक्ती समाजाच्या हितासाठी अहोरात्र कार्यमग्न आहे. या संस्थेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, सहसचिव,विभागप्रमुख, आजिव सेवक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक ,सेवक हे सर्व आमच्या संस्थेचे कुटुंबीय आहेत. हे सर्व कुटुंब म्हणजे "वसुधैवकुटुंबकम" आहे याचा मला अभिमान आहे.सर्व आजी माजी विद्यार्थी हे आमचे वैभव आहे. या वैभवाने महाराष्ट्राला वैभवशाली बनवीण्याचा ध्यास घेतला आहे म्हणुन सर्वात महान सर्व राज्यात अग्रेसर महान राष्ट्र महाराष्ट्र होय.